• Breaking News
    Loading...

    किसान क्रेडिट कार्ड l संपूर्ण माहिती मराठीत l KISAN CREDIT CARD I



    किसान क्रेडीट कार्डद्वारे आता शेतकऱ्यांना 3 लाख

    रुपयांपर्यंत कर्ज पीकांसाठी दिले जाईल. हे कर्ज 7 टक्के  व्याज दराने मिळेल. तसेच योग्य कालावधीत या कर्जाची परतफेड केल्यास शेतकऱ्यांना व्याजात 3 टक्के सवलतही दिली जाईल. त्यामुळे हे कर्ज शेतकऱ्यांना 4 टक्केच व्याजदाराने उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर विनातारण दिल्या जाणाऱ्या 1 लाख रूपयां पर्यंतच्या कर्जमर्यादेतही वाढ करण्यात आली आहे. आता शेतकऱ्यांना 1 लाख 60 हजार रूपयापर्यंत विनातारण कर्ज मिळणार आहे.

    तर एक लाखाच्या आत कर्ज घेतल्यास त्यावर कसलेही व्याज आकारले जात नाही.

    किसान क्रेडिट कार्ड म्हणजे काय?

    भारत सरकारने सुरू केलेली एक सर्वात बेस्ट योजना आहे. भारत हा एक कृषिप्रधान देश आहे आणि  शेतक-यांना शेतीसाठी बियाणे, खते, कीटक नाशके इत्यादींसाठी त्याचप्रमाणे त्यांच्या उत्पादना संबंधीच्या गरजांसाठी भारत सरकारने ऑगस्ट 1998 मध्ये किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू केली होती.

    2004 मध्ये, ही योजना शेतकऱ्यांच्या शेती आणि बिगरशेतीविषयक कामांमध्ये गुंतवणूकीसाठी असलेल्या कर्जाची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी विस्तारली केली गेली. 2014 मध्ये पुन्हा ही योजना अधिक सोयीस्कर होण्यासाठी बँकांनी ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक किसान क्रेडिट कार्ड प्रदान करण्यास सुरवात केली.

    शेतकर्यांना त्यांच्या जमिनीच्या क्षेत्रफळानुसार 1-3 लाख रुपये मर्यादेपर्यंतचे किसान क्रेडिट कार्ड मिळते

    किसान क्रेडिट कार्ड योजनेचे उद्दिष्ट

    शेतक-यांच्या पुढे दिलेल्या शेतीविषयक इतर गरजांसाठी, एकाच खिडकीमधून सुलभ लवचिक कार्यरीतींनी, बँकिंग प्रणालीकडून, वेळच्या वेळी पुरेसे कर्ज उपलब्ध करणे हे किसान क्रेडिट कार्डचे उद्दिष्ट आहे.

    काढणी कापणीनंतरचा खर्च

     पीक विक्रीचा खर्च भागवण्यासाठी

     शेतकऱ्यांच्या घराच्या खर्चासाठी

     कृषी वस्तूंच्या खरेदीसाठी (जसे की ट्रॅक्टर खरेदी करणे)

     शेती कृषी कार्यात गुंतवणूकीसाठी (उदा. जमीन खरेदी)

    नवीन गाईड लाईन नुसार..

    किसान क्रेडिट कार्ड च्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीपूरक उद्योगाला पाच लाख रुपयापर्यंत कर्ज दिले जाते. यात तीन लाख रुपयांपर्यंत पीककर्ज, तर उर्वरित दोन लाखांच्या रकमेतून शेतीपूरक उद्योगातील कोंबडीपालन, मत्स्यव्यवसाय आदींसाठी कर्ज घेता येत होते. नवीन निर्णयानुसार आता शेळी गट खरेदी, बैलजोडी खरेदी, दुधाळ जनावरांची खरेदी तसेच दूध प्रक्रिया करण्यासाठी आवश्यक साधनसामग्री घेण्यासाठी देखील किसान क्रेडीट कार्डचा वापर करता येणार आहे.

    पूर्वी किसान क्रेडिट कार्डाच्या माध्यमातून पशुसंवर्धनविषयक गरजांसाठी खरेदी करता येत नव्हती. आता नाबार्ड आणि रिझर्व्ह बॅंकांनी पशुपालनविषयक आवश्यक गरजा भागवण्यासाठी या कार्डाचा वापर करता येईल, असे स्पष्ट केले आहे. यामुळे पशुधन वाढ दूध उत्पादनवाढीसाठी याचा फायदा होणार आहे

    किसान क्रेडीट कार्डचे फायदे..

    शेतकरी क्रेडिट कार्ड योजनेंतर्गत शेतकरी शेतीशी संबंधित वस्तू खरेदी  करू शकतो आणि नंतर पिकाची विक्री करून कर्जाची परतफेड करू शकतो.

     याचा मोठा फायदा विशेषतः गरीब शेतकर्यांना आहे ज्यांच्याकडे कमी जमीन आहे. 1.60 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेण्यासाठी जमीन तारण ठेवण्याची गरज नाही. म्हणजेच तुम्हाला कोणत्याही सुरक्षाशिवाय कर्ज मिळते. तसे, 1.60 लाख रुपयांपर्यंतच्या कोणत्याही कृषि कर्जासाठी, शेतीची जमीन तारण म्हणून ठेवण्याची गरज नाही.

     कीटकांचा हल्ला किंवा कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे शेतात पिकांचे नुकसान झाल्यास पीक विमा संरक्षण देखील उपलब्ध आहे. तथापि, याक्षणी पीक विमा ऐच्छिक करण्यात आला आहे.

     शेतकरी क्रेडिट कार्ड योजनेंतर्गत शेतकरी शेतीशी संबंधित वस्तू खरेदी  करू शकतो आणि नंतर पिकाची विक्री करू शकतो आणि कर्जाची परतफेड करू शकतो.

     किसान क्रेडिट कार्डसह दुग्धशाळेसंबंधित कर्जदेखील दिले जाते. किसान क्रेडिट कार्ड दरवर्षी नूतनीकरणाच्या आधारे दहा टक्के वाढीसह पाच वर्षांसाठी बनविले जाते.

    किसान क्रेडिट कार्ड शेतकर्यावरील कर्जाचे ओझे कमी करण्यास उपयुक्त आहे.

    किसन क्रेडिट कार्डचा वापर करून शेतकरी बँकांकडून कमी व्याजदरावर कर्ज घेऊ शकतात. केसीसी धारकांना प्रत्येक पिकासाठी स्वतंत्रपणे कर्जासाठी अर्ज करण्याची गरज नाही.

     देशातील सर्व शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

     किसान क्रेडिट कार्ड ची व्हॅलिडिटी 5 वर्ष असते.व्हॅलिडिटी संपल्यानंतर किसान क्रेडिट कार्ड रिन्यू करता येते.

     किसान क्रेडिट कार्ड वैयक्तिक अपघात विम्याची तरतूद करते जे शेतकरी घेऊ शकतात. अपघाती मृत्यू झाल्यास शेतकर्यांना 50,000 रुपये विमा मिळतो आणि अपघात झाल्यास रू. 25,000 विमा मिळतो.

    किसान क्रेडीट कार्डसाठी पात्रता ..

     प्रधानमंत्री किसान सन्मानयोजनेचा लाभ घेणारे सर्व लाभार्थी.

     शेतकरी - एकटा किंवा संयुक्तपणे, ज्यांच्या स्वत: च्या मालकीची जमीन आहे

     सर्व शेतकरी जे लागवड केलेल्या जमिनीचे वैयक्तिक कर्जदार किंवा संयुक्त कर्जदार आहेत आणि पशुपालन आणि मत्स्यपालनासारख्या शेतीमध्ये किंवा संबंधित कार्यात गुंतलेले आहेत.

     भाडेकरू शेतकरी, तोंडी पट्टे आणि शेती करणारे.

    किमान वय - 18 वर्षे आणि कमाल वय - 75 वर्षे

    किसान क्रेडीट कार्डसाठी आवश्यक कागदपत्रे..

     केसीसीसाठी अर्जाच्या वेळी अर्जदार शेतकर्यांना खालील कागदपत्रे सबमिट करणे आवश्यक आहे-

    केसीसी अर्ज - योग्य प्रकारे भरलेला

    खालीलपैकी कोणताही अॅड्रेस पुरावा - आधार कार्ड, मतदार ओळखपत्र / ड्रायव्हिंग लायसन्स / पॅनकार्ड / पासपोर्ट .

    पुढीलपैकी कोणताही ओळख पुरावा- मतदार ओळखपत्र / आधार कार्ड / ड्रायव्हिंग लायसन्स / पासपोर्ट .

    अर्जदाराचे पासपोर्ट आकाराचे फोटो

    जमीनीची कागदपत्रे

    बँकेने ठरविल्याप्रमाणे इतर कागदपत्रे

    3 लाखपर्यंतचे किसान क्रेडिट कार्ड बनविण्यासाठी सर्व प्रक्रिया शुल्क माफ आहे.


    CALL FOR MORE INFORMATION
    7022440762/8762486242
    Email : kktavanoji.co@gmail.com


    No comments:

    Post a Comment

    Welcome to my site please read and sent feedback on comment box

    '; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();

    News